जीवनावश्यक वस्तुमध्ये 'या' वस्तूचा समावेश


मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : केंद्र शासनाने दि. 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत मास्क ( 2 प्लाई यव 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन 95 मास्क) व हॅन्ड सॅनेटाइजर या वस्तूंचा दिनांक 13 मार्च 2020 पासून दिनांक 30 जून 2020 पर्यत जीवनावश्यक वस्तू म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांचा समावेश कोरोना उद्रेकाच्या पाश्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाचे उपभोक्ता मामले खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांचेकडील अधिसूचनेप्रमाणे मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांचे उत्पादन, गुणवत्ता, वितरण व वाहतूक यापुढे जीवनावश्यक वस्तू म्हणून नियंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व मास्क व हॅन्ड सॅनेटाइजरचा अनधिकृत साठा करणे, अधिकतम विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे तसेच अयोग्य दर्जा असलेल्या मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांची विक्री करणे या सर्व बाबी जीवनावश्यक वस्तू अधिनियम मधील कलम 3 चे उल्लंघन समजून अधिनियमातील कलम 7 अन्वये कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात येईल. याची सर्व औषध विक्रेते (होलसेलर व रिटेलर) यांनी नोंद घ्यावी.

तसेच मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांचा अनधिकृत साठा करणे अधिकतम विक्री किमंतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे व अयोग्य दर्जा असलेल्या मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांची विक्री करणे अशी बाब आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post