421 वर्षांत प्रथमच नाथषष्ठीच काल्याची दहीहंडी मंदिराबाहेर, कोरोनामुळे नाथषष्ठी रद्द
माय अहमदनगर वेब टीम
पैठण - पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या ४२१ व्या नाथषष्ठी पहिल्यांदाच कोरोनामुळे रद्द करावी लागली असली तरी यात ही इतिहासात प्रथमच सामान्य वारकऱ्यांसाठी काल्याची दहीहंडी मंदिराच्या बाहेर फोडण्यात आली. पाच वर्षापासून सामान्य वारकऱ्यांसाठी काल्याची दहीहंडी बाहेर फोडली जावी, या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने आज रोजगार व फलोत्पादन मंत्री यांच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर दहीहंडी फोडण्यात आली. तर नाथवंशज यांच्या हस्ते मानाची दहीहंडी समाधी मंदिरात फोडली.
नाथषष्ठीचा तीन दिवसीय उत्सवात काल्याच्या दहीहंडीला सर्वात जास्त महत्त्व असल्याने काल्याच्या दहीहंडीचा प्रसाद घेतल्याशिवाय येथील एकही वारकरी परतीला लागत नाही. यंदा मात्र कोरोनामुळे यात्राच रद्द करावी लागली असतानाच वारकऱ्यांनी यात ही नाथ महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
शनिवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवात काल्याचा प्रसाद हा वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र काल्याची दहीहंडी ही मंदिरात फोडली जात होती. यात वारकऱ्यांना तर याचा लाभ होत नव्हता. शहरातील व काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांचा हा मंदिरातील दहीहंडीचा उत्सव असल्याची चर्चा भक्तांमध्ये होतीी. मात्र आज दहीहंडी सर्वासाठी मंदिराच्या समोरच्या भव्य डोम मध्ये फोडण्यात आली.
नाथषष्ठीत काल्याची दहीहंडी ही मंदिर परिसरात फाेडली जाते. परंतु मंदिर परिसरात केवळ पासधारक व मान्यवर सुमारे ७०० जणांना प्रवेश मिळतो. यातून मुख्य वारकऱ्यांना मात्र या दहीहंडीचा साेहळा जागेअभावी अनुभवता येत नव्हता. अनेकांनी दहीहंडी मंदिराबाहेर फाेडावी या वारकऱ्यांच्या मागणीला लावून धरत पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने दहीहंडी मंदिराबाहेर फाेडल्याने सामान्य वारकऱ्यांना डाेळ्यांनी हा साेहळा अनुभवता अाला.
Post a Comment