शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरून राजकारण पुन्हा तापलं


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. कर्जमाफी दिल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील असा सरकारचा दावा आहे. कर्जमाफीने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीतर त्यासाठी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे असे मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. सर्वच पक्ष आश्वासने देतात पण शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाहीत.

त्यातून शेतकरी संकटात येतो नी तो आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतो. त्यामुळे या आत्महत्यांना सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. शेतीवरील भार कमी करण्यासाठी इतर पर्याय शोधण्याची गरज आहे. आता शेतीपूरक जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, व्यवसायाकडे वळायला हवे, असे मत माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post