अनिल कुंबळे कसोटीतील 'या' निर्णया विरोधात


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : अनिल कुंबळेचे कसोटी बाबत स्पष्ट मत आहे. त्याच्या मते, कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असावे. ते चार दिवसांचे झाले तर कसोटी म्हटले जाणार नाही. आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षांनी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या त्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले. ज्यात मनोहर यांनी म्हटले होते की, कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी होतेय. कुंबळेने म्हटले की, कसोटी आज देखील क्रिकेटमधील सर्वात चांगला प्रकार आहे. टीव्ही व डिजिटल माध्यमामुळे चाहत्यांची पाहण्याची सवय बदलली. कुंबळेने म्हटले, चाहत्यांना स्टेडियमपर्यंत आणायचे असेल तर स्टेडियममधील सुविधा चांगल्या कराव्या लागतील. कसोटी क्रिकेट बाबत आयसीसीच्या पूर्ण सदस्यांची मते वेगवेगळी आहेत. काही सदस्यांच्या मते आयसीसी २०२३ पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसांचे करावे. व्यवस्थापकाच्या मते, प्रत्येक कसोटीतील १ दिवस कमी झाल्याने क्रिकेट कॅलेंडरमध्ये अधिक वेळ मिळले. ज्यामुळे खेळाडूंवरील अतिताण कमी होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post