'सूर्यवंशी'चा, ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनलेला अक्षय कुमार स्टारर कॉप ड्रामा 'सूर्यवंशी' चा ट्रेलर 2 मार्च (सोमवारी) रिलीज होणार आहे. मात्र, ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरन आदर्शचे म्हणणे आहे की, त्याने हा ट्रेलर पाहिला आहे आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. त्यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती शेअर केली.

आदर्शने लिहिले आहे, "'सूर्यवंशीचे ट्रेलर पाहिले. खूपच दमदार आहे. रोहित शेट्टी खरोखरच मनोरंजनाचा सम्राट आहे. अक्षयला अॅक्शन मोडमध्ये पाहून चांगले वाटले. बॉक्स ऑफिसवर सुनामीसाठी तयार राहा."


4 मिनिटांचा असेल ट्रेलर...
आदर्शने आणखी एका ट्वीटमध्ये सांगितले की, 'चित्रपटाचा ट्रेलर 4 मिनिटांचा आहे. 2 मार्चला हा मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये रिलीज केला जाईल. सिंघम (अजय देवगण), 'सिम्बा' (रणवीर सिंह) आणि सूर्यवंशी (अक्षय कुमार) ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सामील होतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post