ट्रम्प यांनी बाहुबली थीमवर बनलेला आपला व्हिडिओ केला शेअर, म्हणाले....
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला कुटुंबासमवेत भारत दौऱ्यासाठी येत आहेत. त्यांनी शनिवारी 'बाहुबली' चित्रपटाच्या थीमवर बनलेला एक व्हायरल व्हिडिओ रीट्वीट केला. ज्यामध्ये ते अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात दिसले. 81 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी मेलानिया आणि त्यांची मुलगी इवांका आणि त्यांचा मुलगा जूनियर ट्रम्पदेखील दिसला. हा व्हिडिओ Solmemes1 नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केला गेला आहे. हा रीट्वीट करत ट्रम्प यांनी लिहिले, 'भारतातील 'महान मित्रांना' भेटायला उत्साहित आहे'

व्हिडिओमध्ये काय आहे ?

व्हिडिओमध्ये 'बाहुबली' मधील वेगवेगळी दृश्ये दाखवली गेली आहेत. सुरुवात युद्धभूमीपासून होते. यामध्ये बाहुबली बनलेल्या प्रभासच्या चेहऱ्यावर ट्रम्प यांचा चेहरा लावला गेला आहे. जो आपल्या माहिष्मती साम्राज्याच्या सुरक्षेसाठी युद्धभूमीवर तलवार धनुष्यबाण आणि भाल्याने शत्रूला पराजित करतो. एका दृश्यात अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि त्यांची मुलगी इवांकादेखील दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात ट्रम्प यांच्या स्वागतासाठी नरेंद्र मोदी माहिष्मतीच्या लोकांना पेढे वाटताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी रजक मॅसेज येतो, 'यूएसए अँड इंडिया यूनायटेड. हा व्हिडिओ सोशल मीडियाव्हायरल होत आहे. काही तासातच याला 6 लाखवेळा पाहिले गेले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post