इंदुरीकर महाराजांच्या समर्थनात 'अकोले बंद'


माय अहमदनगर वेब टीम
अकोले- ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे विधान करणारे ‘प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात वादळ उठलेले असताना आता इंदुरीकर यांच्या समर्थनाथ अकोले तालुका एकवटला आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई विरुद्ध प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज वाद आणखी वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. तृप्ती देसाींनी ‘इंदुरीकरांना काळ फासण्याचे वक्तव्य केले होते’. त्या विरोधात आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे टाळ, मृदुंगाच्या गजरात निषेध करण्यात येणार आहे. तसेच जागो जागी फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी गाड्यांवरही पोस्टर लावण्यात आले आहेत. 

‘बंद’ कशामुळे
अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनाथ आज संपूर्ण अकोले तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी याबाबत पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रकात म्हटले होते. मात्र, इंदुरीकरांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही तृप्ती देसाई यांनी त्यांना काळ फासण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नागरिक संतापले आणि संतापलेल्या नागरिकांनी आज ‘अकोले बंद’ची हाक दिली आहे.
पुत्रप्राप्तीचे कीर्तनातून मंत्र देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांचा पाय आणखी खोलात जाऊ लागला आहे. नगरमध्ये किर्तनात मी असे काही बोललोच नाही, ही पळवाट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेले पुत्र प्राप्तीचे सल्ले नगरमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य संचलनालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माफीनामा देणार्‍या इंदुरीकरांनी आपण नगरमध्ये असे काही बोललोच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याबाबतचे पुरावेही यूट्यूबवरून दूर करण्यात आले. इंदुरीकर यांना हायसे वाटत असतानाच त्यांच्या सल्ल्याचे नवे पुरावे हाती आले आहेत. त्यांनी ते सल्ले उरण येथे इंचगिरी संप्रदाय या वारकरी संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर दिल्याचे उघड झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post