'आरएसएस'वरच बंदी घाला


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली-  देशात मनुस्मृतीविरुद्ध संविधान, अशी युद्धजन्य स्थिती आहे. पुन्हा मनुस्मृतीची प्रतिस्थापना करण्यासाठी
आरएसएस धडपडत असून एनआरसी, एनपीआर व
सीएएसारखे काळे कायदे त्याचेच द्योतक आहे. आरएसएस पडद्याआडून आपला अजेंडा राबवत असून हिंमत असेल तर जनतेत जाऊन आपल्या अजेंड्यावर मतं मागावी. वंचित, दुर्बल व बहुजनांचा विकास त्यांना बघवत नाही. देशातून
मनुवाद हद्दपार करायचा असेल तर सर्व समस्यांचे मूळ असलेल्या आएएसएसवरच बंदी घाला, असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रेशिमबागेच्या मैदानातून
गरजले. भीम आर्मीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा आज २२ पेâब्रुवारी रोजी रेशिमबाग मैदानात पार पडला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समीर अहमद सिद्दीकी, नेहा श्ािंदे, नागेश चौधरी, प्रमोद मून, मनीष साठे, जाकीर बिल्डर, आमीर खान, मलकितसिंग बलवा, अशोक कांबळे, मुकेश खडतकर, तन्वीर अहमद सिद्दीकी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post