'या' अवार्ड्समध्ये हृतिक रोशन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता


माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्कः अलीकडेच मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2020 ची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात अभिनेता हृतिक रोशनला त्याच्या 'सुपर 30' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी विकास बहल दिग्दर्शित 'सुपर 30' सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेला. विशेष म्हणजे हा चित्रपट जुलै 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकने बिहारचे गणितज्ञ आणि सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती.

सोहळ्यात, किचा सुदीपला मोस्ट प्रॉमेसिंग अ‍ॅक्टरचा किताब देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता धीरज धुपर यांची निवड झाली. या सोहळ्यात हृतिक रोशन, दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई, दिया मिर्झा आणि मलायका अरोरा यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post