सरकारबद्दल शरद पवार यांनी केले 'हे' मोठे विधान


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून हे सरकार पाच वर्ष चालणार याची मला खात्री आहे. सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि ते दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करीत नाहीत या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करतानाच या सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत स्पष्ट केले.

प्रत्येक सरकारचा रिमोट हा कोणाच्या ना कोणाच्या हातात असल्याचे बोलले जात असे. काँग्रेसच्या काळात दिल्लीतील हाय कमांडच्या हातात रिमोट कंट्रोल असे तर युतीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात रिमोट कंट्रोल असे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार शरद पवारच चालवत आहेत. त्यांच्याच हातात रिमोट कंट्रोल आहे असे म्हटले जात होते. परंतु शरद पवार यांनी रिमोट त्यांच्या हातात नसल्याचे स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post