दौऱ्याच्या 3 महिन्यांपूर्वीच सीक्रेट एजंट दाखल होतात, राष्ट्रपतींच्या मार्गावर गाडी पार्क करण्यासही मनाई
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प गुजरातमधील अहमदाबादला येतील आणि त्यानंतर आग्रा ताजमहाल पाहण्यासाठीही जातील. अमेरिकेचा राष्ट्रपती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानला जातो. या शक्तिशाली व्यक्तीची सुरक्षाही तेवढीच खास असते.

भारतात आल्यानंतर ट्रम्प थ्री-लेअरच्या हाय सिक्योरिटीमध्ये राहतील. पहिल्या लेअरमध्ये अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस, त्यानंतर एसपीजी आणि नंतर अहमदाबाद क्राईम ब्रँच. अमेरिकी न्यूज वेबसाईट ऑर्गोनियनच्या रिपोर्टनुसार, अमेरिका राष्ट्रपतींच्या कोणत्याही दौऱ्यापूर्वी सिक्रेट सर्व्हिस तीन महिन्यांपूर्वीच तेथे पोहोचते आणि तेथील स्थानिक पोलिसांसोबत मिळून सुरक्षेची तयारी सुरु करतात. राष्ट्रपती येण्यापूर्वीच एअरस्पेस क्लिअर केला जातो. ट्रम्प एअरफोर्स विमानाने भारतात येतील. हे जगातील सर्वात सुरक्षित विमान मानले जाते. हे विमान राष्ट्रपतींच्या ऑफिसप्रमाणेच असते. एका ऑफिसमध्ये असतात अशा सर्व सुविधा या विमानात उपलब्ध असतात.

मेरिकेचे राष्ट्रपती येण्यापूर्वी कशाप्रकारे तयारी केली जाते?
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी कमीतकमी तीन महिन्यांपूर्वीच यूएस सिक्रेट सर्व्हिस एजंट दौऱ्याच्या ठिकाणी पोहोचतात. एजंट येथेही स्थानिक पोलीस आणि सुरक्षा एजन्सीसोबत मिळून राष्ट्रपती दौऱ्याची योजना तयार करतात. ट्रॅव्हल रूट आणि सर्वात जवळच्या ट्रॉमा हॉस्पिटलची पाहणी करतात. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून राष्ट्रपतींना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाण निश्चित करतात.

- ज्या लोकांपासून राष्ट्रपतींना धोका होऊ शकतो अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर बारीक नजर ठेवली जाते तसेच त्यांना कडक सूचनाही दिल्या जातात.

- राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वीच स्निफर डॉग्स आणले जातात. यांच्या मदतीने राष्ट्रपतींच्या रूटची तपासणी केली जाते. यासोबतच रस्त्यावर कुठेही गाड्या उभ्या करण्याची परवानगी नसते.

एअरफोर्स वन : जगातील सर्वात सुरक्षित म्हणाल्या जाणाऱ्या या बोइंग 747-200 बी शृंखलेच्या या विमानाला चालते फिरते व्हाइट हाऊस किंवा सर्व सुविधांनी युक्त शहर म्हणणे उचित ठरेल. असे कोणतेच काम किंवा सुविधा नाही, जी या विमानात नाही. अत्याधुनिक सुरक्षा आणि संचार साधनांव्यतिरिक्त हवेमध्ये ईंधन भरण्याच्या क्षमतेमुळे हे अनेक तर हवेमध्ये राहू शकते, तेही रेंजच्या समस्येविना. विमानात राष्ट्रपतींसाठी कार्यालय, विश्राम कक्ष आणि गरज पडल्यास सर्व सुविधा असलेले ऑपरेशन थिएटरची देखील सुविधा आहे. हे विमान एकटे उडत नाही. शत्रूला फसवण्यासाठी हुबेहूब त्याच्यासारखेच असलेले दुसरे विमानही हवेमध्ये असते.

विमानात 4 हजार स्क्वेअरफूटचा एरिया, दोन किचन, कॅमेरे, कॉन्फरन्स रूमसुद्धा

तीन फ्लोअरच्या या विमानात 4 हजार स्क्वेअरफूटचा एरिया आहे. यामध्ये राष्ट्रपतींसाठी विशेष कक्ष असतो. मेडिकल सुविधा, कॉन्फरन्स रूम, डायनिंग रूम आणि जिमही असते. यामध्ये दोन किचन असून एकाच वेळी 100 लोकांचे जेवण बनवले जाऊ शकते. यासोबतच यामध्ये प्रेम, सिक्युरिटी स्टाफ, ऑफिस स्टाफ आणि व्हीआयपी लोकांच्याही रूम असतात.

राष्ट्रपतींजवळ न्यूक्लिअर अटॅकचे बटन नेहमी सोबत राहते
2018 मध्ये उत्तर कोरियाचा तानशाह किम जोंग-उनने ट्रम्प यांना धमकी देत म्हटले होते की, आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्बचे बटन आहे. त्यावर उत्तर देताना अमेरिका राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले- आमच्याकडे त्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आणि मोठे बटन आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, राष्ट्रपतींसोबत नेहमी एक लेदर बॅग घेऊन मिल्ट्री ऑफिसर राहतो. या बॅगमध्ये न्यूक्लिअर वेपनचा वापर आणि लॉन्च करण्याचे कोड असतात. या बॅगला 'फुटबॉल' म्हणतात. हा एक युनिट कोड नेहमी राष्ट्रपतींकडे असतो. राष्ट्रपती कोणत्याही दौऱ्यावर असताना काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ते न्यूक्लिअर वेपन लॉन्च करण्याचे आदेश देऊ शकतात.

ट्रम्पची 'द बीस्ट' कार : न्यूक्लियर अॅटॅक सहन करू शकते, टायर पंक्चर झाल्यावरही धावेल

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी त्यांची कार "द बीस्ट" अमेरिकन हवाई दलाच्या सी -17 ग्लोबमास्टर परिवहन विमानातून भारतात दाखल झाली आहे. ही कार अमेरिकेची कंपनी जनरल मोटर्सने तयार केली आहे. ट्रम्प यांच्या कारला जगातील सर्वाधिक सुरक्षित कार मानली जाते. या कारवर न्यूक्लियर अॅटॅक आणि केमिकल अॅटॅकचा परिणाम होत नाही. या कारचे वजन 20 हजार पाउंड (10 हजार किलो) असते. तर किंमत जवळपास 10 कोटी रुपये आहे.

या कारमध्ये मशीनगन, टियर गॅस सिस्टम, फायर फाइटिंग आणि नाइट व्हिजन कॅमेरासारखे इक्विपमेंट आहे. गरज भासल्यास या कारने शत्रूवरही हल्ला करता येऊ शकतो. कारची टायर रिम मजबूत स्टीलने बनलेली असते. कारचे टायर पंक्चर झाले तर कारच्या स्पीडवर काहीही परिणाम होत नाही. या गाडीत जे पेट्रोल टाकण्यात येते, त्यात खास फोम मिसळले जाते, जेणेकरून स्फोट होणार नाही.

कारचे गेट 8 इंच जाड असून त्याची खिडकी बुलेट प्रूफ आहे. मात्र कारची फक्त एक विंडो उघडते जी ड्रायव्हर सीटच्या बाजूला आहे. ड्रायव्हरची केबिन आणि ट्रम्पच्या केबिनमध्ये एक काचेची भिंत देखील असते, जेणेकरून जेणेकरून ट्रम्प यांची गुप्त बैठक आणि गुप्त चर्चा होऊ शकते. ट्रम्प यांच्याकडे एक सॅटेलाइट फोन असतो, ज्याच्या मदतीने ते कधीही कुणाशीही बोलू शकतात. या कारच्या डिग्गीत ट्रम्प यांच्या ब्लड ग्रुपचे रक्त देखील असते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post