सीएए, एनआरसी, धार्मिक स्वातंत्र्यावर ट्रम्प पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प पंतप्रधान मोदींशी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यांसह धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिका भारताच्या लोकाशाही परंपरा आणि संस्थानांचा खूप आदर करत असल्याचं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. तसेच, ट्रम्प यांच्या दौऱ्याअगोदर अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हे देखील सांगण्यात आले की, धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. भारत दौऱ्यावर असताना ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यावर अमेरिका चिंतीत असल्याचंही यावेळी अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. याशिवाय, ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर लोकशाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वातंत्र्याच्या मुद्यांबद्दलही बोलणार असल्याचंही म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post