चाकूचा धाक दाखवुन लुटणारी टोळी जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीस कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे .हे आरोपी पोलिसांनी नगर-पुणे हायवे जेरबंद केले .

विशाल विजय कोबरणे यांना माळीवाडा बसस्थानक येथुन एका पांढरे रंगाच्या व्हिस्टा कार मध्ये बसवुन त्यांना राहुरी फक्टरीयेथे सोडतो असे म्हणुन त्यांना गळयाला चाकु लावुन व लाथाबुक्याने मारहान करुन त्यांचे खिशातील रोख रक्कम,मोबाईल, पाकिट असे बळजबरीने काढून घेतले बाबत त्यांनी
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळवून आरोपी १) कय्युम काझी कुरेशी वय २३ वर्ष रा. बाबा वंगाली ,कलेक्टर कचेरी जवळ अहमदनगर २) सद्दाम मोहम्मद अली वय- २३ वर्ष रा. झंडीगेट, नालसाबचौक ,अहमदनगर ३) मोईन बादशाह शेख्र वय- २० वर्ष रा.बुरूडगाव रोड काळे गल्ली, भोसलेआखाडा, अहमदनगर ४) मुसेफ नासीर शेख बय २० वर्ष धंदा वाहन ट्रेव्हलर रा मुकुंदनगर जिशान कालनी
भिंगार जि अहमदनगर यांना जेरबंद केले .यामध्ये एकुण ११,४६.५००/- रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे .उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ पो.उपनिरीक्षक सतीश शिरसाठ कर्मचारी शाहीद शेख,गणेश धोत्रे, नितीन शिंदे, भारत इंगळे सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post