समाजसेवकाकडे अपमान पचवण्याची शक्ती हवी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे


पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा नागरी सत्कार समारंभ
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: समाज कार्य करण्यासाठी प्रत्येक समाज सेवकाकडे शुद्ध विचार असावेत. त्यांचे जीवन निष्कलंक असावे. महत्त्वाचे म्हणजे अपमान पचवण्याची शक्ती त्यांच्याकडे असली पाहिजे. अपमान पचविण्याची शक्ती त्याने ठेवली तर, समाज कार्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते. ही सर्व वैशिष्ट्ये पोपटराव पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या कार्याचा देश पातळीवर गौरव झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन पाळले आहे. त्यांच्या लेखी भाषण कार्यक्रमात वाचून दाखविताना पवार यांना पद्मश्री मिळाला. त्यामुळे नगर जिल्ह्याची मान उंचाविली असून, त्यांना आता पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यास सर्वाधिक आनंद मला होईल, अशा शब्दात त्यांनी सांगितले.

नगर शहराच्यावतीने भारत सरकारचा पद्मश्री बहुमान जाहीर झाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा नागरी सत्कार व स्वच्छ प्रेरणा अभियानाचा उपक्रमाचा शुभारंभप्रसंगी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पदाश्री डॉ. तात्याराव लहाणे, आ. अरुणकाका जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते, कोहिनूरचे संचालक प्रदीप गांधी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे म्हणाले की, ग्रामीण भागात सामाजिक काम करणे कठीण आहे, मात्र आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये प्राथमिक आरोग्य, शिक्षणाचा विकास केला असून त्याचा आदर्श प्रत्येक गावातील सरपंचांनी घ्यावा, नगर जिल्ह्यात शिर्डी व शनिशिंगणापूर ही दोन देवस्थाने आहेत तसेच या जिल्ह्यात ज्येष्ठ

समाजसेवक अण्णासाहेब हजारे व पोपटराव पवार हे दोन मानवरुपी देवच आहेत. परमहंस व स्वामी विवेकानंद यांचे जसे गुरु- शिष्याचे नाते होते, तसेच गुरु शिष्याचे नाते या दोघांमध्ये आहे. शासनावर अंकुश ठेवण्याचे काम अण्णा हजारे करतात. पोपटराव पवार हे पाणी नियोजन, खेड्यांच्या विकासाचे ते खरे मानकरी आहेत. खेड्यात काम करणे खूप अवघड असल्याचे

त्यांनी सांगितले. गावातच रोजगार निर्माण झाल्यास तरुण वर्ग शहराकडे जाणार नाही. प्रत्येक सरपंचाने यांचा आदर्श घेतल्यास देशातील सर्वच खेडेगाव सुधारतील व पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार सारखी शंभर गावे आदर्श करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अण्णा हजारे हे आधुनिक गांधी म्हणून त्यांचा उल्लेख केला.




यावेळी पोपटराव सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, पाण्याची समस्या आता अंतराराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पद्वश्री बहुमानामुळे खूप मोठी जबाबदारी खांद्यावर पडली आहे. माझी जन्मभूमी हिवरे बाजार असली तरी माझी कर्मभूमी नगर शहर आहे. माझे शिक्षण याच शहरात झाले. याच

वाडियापर्क मैदानावर मी क्रिकेटचे धडे गिरवले. त्यामुळे माझे सर्वच समाजातील मित्र नगरमध्ये आहेत. आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरात स्वच्छतेचे धोरण राबवून शहराचे सुसोभिकरण करण्याचा मानस व्यक्त केला. त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा राहील, असे ते म्हणाले.




यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व पोपटराव पवार यांच्या कामाचा गौरव देशपातळीवर घेण्यात आला. आजच्या तरुण पिढीने यांचे विचार अंगिकारुन समाजामधील प्रलंबित असलेले असंख्यप्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. हिवरे बाजार व राळेगणसिद्धीमुळे अनेक गावांना दिशा मिळाली आहे. स्वच्छ

शहराची प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. आपल्या नगर शहराची सीना नदीची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सीना नदीच्या सुशोभिकरणाच्या कामाला हातभार लावावा. स्वच्छ प्रेरणा अभियान आता नगर शहरातील शाळा, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालये यामध्ये स्वच्छतेचा जागर सुरु करणार आहे. स्वच्छतेची प्रेरणा विद्यार्थी दशेतच

मिळायला हवी, अशी संकल्पना आम्ही घेऊन शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ उभी करणार आहोत, असे म्हणाले.




यावेळी डॉ. शरद कोलते व महापौर बाबासाहेब वाकळे, उद्योजक प्रदी गांधी यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन जॉय लोखंडे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post