राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षपदी नृत्य गोपाल दास, तर माजी कॅबिनेट सचिव नृपेंद्र मिश्रा बांधकाम समितीचे अध्यक्ष
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख पाराशरण यांच्या घरी ट्रस्टची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर पाराशरण यांनी सांगितले की, न्यास महंत नृत्य गोपाल दास ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय ट्रस्टचे सचिव असतील. तर गोविंद देवगिरी यांना कोषाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट सचिव नृपेंद्र मिश्रा यांची मंदीर निर्माण समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली.
15 दिवसांनंतर अयोध्येत ट्रस्टची बैठक होणार आहे. मंदीर निर्माण समिती या बैठकीत आपला अहवाल सादर करेल. या अहवालावरून मंदीर निर्माणाची तारीख निश्चित करण्यात येईल.
एखाद्या सदस्याने माघार घेतल्यास काय होईल?
जर सरकारी अधिकारी सदस्य (जसे जिल्हाधिकारी) ची बदली झाली तर त्याच्या जागी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला सदस्य बनवण्यात येईल. स्थायी सदस्याने माघार घेतल्यास ट्रस्टचे उर्वरित सदस्य त्यांच्या जागी संयुक्तपणे दुसर्या कोणाची नेमणूक करू शकतात.
Post a Comment