चारशे वर्षांनंतर पैठणला नाथषष्ठीची दहीहंडी मंदिराबाहेर फोडली जाणार
माय अहमदनगर वेब टीम
पैठण - पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला १४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यापूर्वी प्रशासन, नागरिक व नाथ विश्वस्त मंडळाची मंगळवारी बैठक झाली. तब्बल ४०० वर्षांनंतर प्रथमच काल्याची दहीहंडी मंदिराबाहेर फोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नाथ वंशज प्रतिनिधींना या बैठकीत बोलावण्यात आले नसल्याने आता ते याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असणार आहे.
मागील ४०० वर्षांपासून नाथषष्ठीला काल्याची दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. संत एकनाथ महाराज मंदिरात ही हंडी फोडली जाते. मंदिरात जागा कमी पडत असल्याने व साऱ्यांनाच या सोहळ्याचा लाभ व्हावा म्हणून मंदिराबाहेर दहीहंडी फोडण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून वारकऱ्यांतर्फे केली जाते.
Post a Comment