आगीचा बोळा टाकून हॉटेल पेटविण्याचा प्रयत्न


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – हॉटेलच्या बंद शटरजवळ कापडाच्या बोळ्यावर पेट्रोल टाकुन पेटवून पेटता बोळा हॉटेलच्या शटर जवळ ठेवुन हॉटेल पेटविण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केला. ही घटना सर्जेपुरा येथील मिसाळ गल्लीतील हॉटेल संजय येथे शनिवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास घडली.

सागर विलास लांडगे (वय-36, रा.मिसाळ गल्ली, सर्जेपुरा) यांचे हॉटेल संकल्प परमीट रूम व बिअर बार नावाचे हॉटेल आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने शनिवारी पहाटे त्याच्या जवळील मोटारसायकलवर येऊन हॉटेल संकल्प पेटवुन देण्याच्या उद्देशाने कापड्याचा बोळा पेट्रोलमध्ये बुडवुन हॉटेलच्या शटरजवळ ठेवुन पेटविला. तसेच शटर जवळील पायबुसनीचे व शटरच्या कुलुपाचे नुकसान करून पळुन गेला.

याप्रकरणी सागर लांडगे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 435, 427, 511, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हे.कॉ. बिलाल शेख हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post