माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शनिवारी रात्री (दि. 15) नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुलबर्गा (कर्नाटक) येथील चौघांना नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर गावच्या शिवारात हत्यारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
देवराज कृष्णप्पा खडमंची (वय- 45), मारूती शिवकुमार खडमंची (वय- 19), रवी आनंद खडमंची (वय- 19), नागराज देवराज खडमंची (वय- 19 सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर, एक जण पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक टीव्हीएस स्टार दुचाकी, एक स्टीलचा सत्तूर, एक सूरा, एक लोखंडी दांडके, पाच मोबाईल असा 22 हजार 850 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
Post a Comment