अरविंद केजरीवालांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्रिपदाची शपथघेतली. असे करणारे तेतिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वीकाँग्रेसच्याशिला दीक्षित यांनी तीन वेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि 6 आमदारांनीमंत्रिपद आणि गोपनियतेचीशपथ घेतली. सहा आमदारांमध्येमनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा सहभाग आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडले तर एकाही नेत्याला शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले नाही.

या शपथविधी सोहळ्यासाठीरामलील मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती.याशिवाय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सुरक्षासाठी पोलिसबल तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस आणि पैरामिलिट्री दलाचे दोन ते तीन हजार जवान समारंभाठिकाणी तैनात केले असल्याचे सांगितले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post