इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य ; तृप्ती देसाई यांना स्मिता अष्टेकर यांचे खुले आव्हान
माय अहमदनगर वेब टिम
अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मंगळवारी (ता. 18) नगरला येणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ नगरच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनीही सोशल मीडियावरून देसाई यांच्याबाबत टोकाचे शब्द वापरून त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता देसाई विरुद्ध अष्टेकर याच्यात जुपण्याची चिन्हे आहेत.
महाराजांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात एक गट सक्रीय झाला आहे. महाराजांनी केलेल्या वक्तव्याबाबत काही अभंगाचे दाखले सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. आता मंगळवारी सकाळी दहा वाजता नगरच्या माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमून महाराजांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. त्याच पोष्टमध्ये तृप्ती देसाईचा संदर्भ दिला असल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Post a Comment