चोरट्यांचा धुमाकूळ
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सावेडी उपनगरातील सागर विहार, डॉन बॉस्को या भागामध्ये चोरट्यांनी तीन घरांवर डल्ला मारून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सतीष मुरलीधर आहिरे यांनी फिर्याद दिली आहे.
आहिरे नातेवाईकांचे लग्न असल्याने बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी आहिरे राहत असलेल्या डॉन बॉस्को परिसरातील त्यांचे राहते घर फोडले. घरातील २२ हजारांची रोख रक्कम, दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, पेंन्डन्ट असा ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी त्याच रात्री आहिरे यांच्या घराजवळील अरुण पवार व दीपक आसुदानी यांचे घर फोडले. त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोने चोरुन नेले. चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी भेट देवून पाहणी केली. पाळत ठेवून चोरी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने तपास केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment