फरार आरोपी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून पळाला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून पळाला असल्याची घटना सुपा टोलनाका येथे घडली. विश्वजित कासार असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीगत अशी की कासार याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. तो सुपा टोल नाका येथून जाणार असल्याची माहिती मिळाली. फरार आरोपी सुपा येथे आला त्याची गाडी पोलिसांनी अडवली. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेख यांनी त्यास खाली येण्यास सांगितले. शेख त्यास पकडण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करीत, दमदाटी करीत, हाता तोंडावर मारत रिव्हर्स घेर टाकत पुण्याच्या दिशेने धूम ठोकली.

आरोपी कासार याच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा सुपा पोलिस स्टेशन येथे कोतवालिस नेमणूक असलेले प्रमोद लहारे यांनी नोंदवला आहे.


आरोपीवर LCB मेहरबान!
कोतवाली, नगर तालुका, भिंगार कॅम्प, सुपा पोलिस स्टेशनमध्ये कासार याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना त्यांनी जाळ्यात अडकवले आहे. सदर तरुण अनेक गुन्ह्यांवर गुन्हे करत आहेत. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीवर मेहरबान झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post