अर्थव्यवस्थेत भारताने 'या' देशांना टाकले मागे
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत जगातील 5 व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. अमेरिकन थिंक टँक वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने 2019 चा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार भारताचा जीडीपी गेल्यावर्षी 2.94 लाख कोटी डॉलर (209 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचला आहे. ब्रिटन 2.83 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेसोबत सहाव्या आणि फ्रान्स 2.71 लाख कोटी डॉलरसोबत सातव्या क्रमांकावर राहिला. 2018 मध्ये भारत 7 व्या क्रमांकावर होता. तर ब्रिटन पाचव्या आणि फ्रान्स सहाव्या क्रमांकावर होता.
Post a Comment