पुण्यात ‘कोरोना’वरील लस विकसित!


माय अहमदनगर वेब टीम
पुणे- चीनमध्ये सध्या जीवघेण्या ‘करोना’ विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला आहे. आतापर्यंत यामुळं हजारो नागरिकांचे बळी देखील गेले आहेत. शिवाय, करोनाचं जीवघेणं जाळं दिवसेंदिवस जगभर पसरत असल्याने, सर्वत्र चिंतेचं वातावरण देखील जाणवत आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ सध्या यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन करत असताना, पुण्यात मात्र या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात यश आलं आहे.

येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही कामगिरी केली आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित केली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. ही भारताची पहिली लस असेल जी एवढ्या वेगानं या स्तरापर्यंत विकसित करण्यात यश आलं आहे. असं सांगितलं जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post