शाळेसमोरच विद्यार्थिनीचा विनयभंग


माय अहमदनगर वेब टीम

श्रीरामपूर - शहरातील वॉर्ड नं. 1 भागातील एज्युकेशन शाळेच्या गेट समोरून चाललेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत संबंधित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पंकज राजू माचरेकर (रा. गोंधवणी) याच्याविरुध्द भादंवि कलम 354, बालकांचे लौंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम 8, 12 प्रमाणे पोस्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत चालली होती. त्यावेळी शाळेच्या गेटसमोर असलेला आरोपी पंकज माचरेकर सदर विद्यार्थिनीस माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला. या मुलीने याकडे दुर्लक्ष करत ती पुढे निघाली असता आरोपीने तिचा हात पिरगाळून तिच्याशी लज्जा उत्पन्न होर्ईल, असे वर्तन केले. याबाबत सदर विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि समाधान पाटील करीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post