माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील केमिस्ट व्यावसायिक व डॉक्टरांच्या पुढाकाराने सुरु आलेल्या सीपीएल केमिस्ट प्रीमीयर लीग क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. प्रारंभी पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, आयोजन समितीचे अध्यक्ष आनंद बोरा, अक्षत झालाणी, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, संपत बारस्कर, समद खान, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, दिपक सुळ, डॉ.अनिकेत कटारिया, डॉ.अनिकेत कुर्हाडे, डॉ.कस्तुरी कुर्हाडे, डॉ.अमित बडवे, अमित बुरा, मुस्तकीम शेख, डॉ.अश्विन झालानी, डॉ.इशिता झालानी, दत्ता गाडळकर आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, खेळाप्रमाणे जीवनात देखील खेळाडूवृत्ती आत्मसात करण्याची गरज आहे. मैदानावर खेळणारा व्यक्ती जीवनात आलेल्या नैराश्याला बळी पडत नाही. तर सदृढ आरोग्यासाठी खेळ अधिक महत्त्वाचा आहे. खेळाडूंना सीपीएलच्या माध्यमातून केमिस्ट व डॉक्टर बांधवांनी चांगली संधी उपलब्ध करुन दिली असून, जास्तीत जास्त संघांना संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले.
आठ दिवस वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये रात्री फ्लड लाईटमध्ये होत असलेली ही टुर्नामेंट क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरत आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, खेळाला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 संघांचा समावेश असून, टेनिस बॉलवर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 41 हजार रुपयांसह करंडक, द्वितीय विजेत्यास 31 हजार रु., तृतीय विजेत्यास 21 हजार रु. तर चतुर्थ विजेत्यास 11 हजार रुपये व करंडक बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरीजला 3 हजार शंभर रुपये तर प्रत्येक मॅन ऑफ दी मॅचसाठी पाचशे रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सीपीएल आयोजन समितीचे अध्यक्ष आनंद बोरा तसेच समितीचे सदस्य पुरुषोत्तम झंवर, नितीन मुनोत, अक्षत झालाणी, सौरभ झालाणी, सागर बिहाणी, देवेण परदेशी, मनिष सोमाणी, विशाल शेटीया, आशिष खंडेलवाल, प्रणित अनमल, महेश रच्चा, मोहसीन शेख, रुपेश भंडारी, अभिजीत जाधव, योगेश धुप्पड आदी परिश्रम घेत आहे.
या स्पर्धेसाठी सोहम ग्रुपचे नरेंद्र फिरोदिया, एशियन नोबेल हॉस्पिटल, संजीवनी एजन्सी, सिध्देश्वर मेडिकल, आदेश चंगेडिया, शरद डोंगरे, सुधीर लांडगे, राजेंद्र बलदोटा, राजेंद्र बेद्रे, दिपक दासवाणी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव तनपुरे यांनी केले. आभार महेश रच्चा यांनी मानले.
Post a Comment