चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने जिंकली उपस्थितांची मने
शिवम ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- केडगावच्या लोंढे मळा येथील शिवम ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे झाले. यावेळी चिमुकल्यांनी विविध बालगीते, धार्मिक तसेच देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शांतीनिकेतन फार्मसी कॉलेजच्या सचिव सोनाली शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त अशोक कानडे, गोविंदराव भुजबळ, माजी नगरसेवक संजय लोंढे, राजश्री पालवे, संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक शुभम लोंढे, संचालक सौरभ लोंढे, श्रेया लोंढे, अनुराधा लोंढे, नानासाहेब लोंढे, अर्चना लोंढे, प्राचार्य नंदकुमार शेजूळ आदी उपस्थित होते.
यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्कूलमधील २०१९-२०२० चा 'स्टुडंट ऑफ द इयर' पुरस्कार युकेजीमधील गौरी राजेंद्र दळवी व सेमी मोठा गटमधील सर्वेश विकास विधाते यांना प्रदान करण्यात आला. विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. चिमुकल्यांनी विविध बालगीते, धार्मिक तसेच देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून समाजाला एक चांगला संदेश पोहचविण्याचे काम या बालचमुंनी केले.
याप्रसंगी सोनाली शिंदे, भगवान फुलसौंदर यांनी मुलांचे कौतुक करून मुलांना व पालकांना चांगले मार्गदर्शन केले. तसेच मुलांचे व शाळेचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवम ग्लोबल स्कूलचे प्राचार्य नंदकुमार शेजूळ यांनी वर्षभरामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यामध्ये धाडस निर्माण होण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. या मध्ये पालकांना देखील सामावुन घेतले जाते, असे सांगत वार्षिक अहवाल सादर केला. स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका राजश्री यादवाडकर, मयुरी कुलकर्णी, वर्षा मंदिलकर, अश्विनी हारदे, निलीमा ढाके, पूजा दळवी, संगीता देशमुख, उषा कोतकर, अमर जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. मयुरी कुलकर्णी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मोठया संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

Post a Comment