आदित्य ठाकरे, अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ







माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार पुत्र आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा आता वाढवून वाय प्लस करण्यात आली आहे. तर समाजसेवक अण्णा हजारे यांची सुरक्षा वाय प्लस वरून झेड करण्यात आली. दुसरीकडे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह खासदार नारायण राणे, आशिष शेलार, राम शिंदे, प्रसाद लाड, एकनाथ खडसे या भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात अाली. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.


राज्य आणि केंद्र सरकारतर्फे मंत्री, आमदार, खासदार, खेळाडू, कलाकार, समाजसेवक, उद्योगपती आणि राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान केली जाते. या सुरक्षेचा आढावा घेणारी एक समिती असून यात मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य सचिव गृह संजय कुमार,डीजीपी सुबोधकुमार जैसवाल, राज्य गुप्तचर विभाग आयुक्त रश्मी शु्क्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा समावेश अाहे. ही समिती दर तीन महिन्याला सुरक्षेचा आढावा घेते व संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेत वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेतले. या समितीची नुकतीच एक बैठक झाली ज्यात राज्यातील ९७ व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यात २९ व्यक्तींच्या सुरक्षा श्रेणीत वाढ वा कपात करण्यात आली तर १६ व्यक्तींना श्रेणीबाह्य करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post