' या ' परीक्षांची घोषणा; २०० जागा भरणारमाय अहमदनगर वेब टीम
नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील १५ पदांवर एकूण २०० जागांवर या परीक्षेद्वारे भरती केली जाणार आहे.

यातील सर्वाधिक नायब तहसीलदाराची पदे आहेत. यासाठी एप्रिल महिन्यात पूर्व, तर ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे.‘एमपीएससी’ने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार राज्य सरकारमधील १५ पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

गट ‘अ’ आणि गट ‘ब’च्या २०० जागांसाठी ही भरती होईल. यामध्ये सर्वाधिक नायब तहसीलदार या ७३ जागांची भरती केली जाणार आहे. सहायक राज्यकर आयुक्त १० पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी ७, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी १, उद्योग उपसंचालक, तांत्रिक १, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता २ अशी वर्ग एकमधील २१ पदांची भरती केली जाईल.

वर्ग ‘ब’मधील उपशिक्षणाधिकारी, शिक्षणसेवा २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गटविकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उपाधीक्षक भूमी अभिलेख ६, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग १, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी तत्सम ११ पदांची भरती केली जाईल.

या पदांसाठीची पूर्व परीक्षा ५ एप्रिल २०२० ला राज्यातील ३७ केंद्रावर घेण्यात येईल. यासाठी २३ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २, ३ व ४ ऑगस्ट २०२० रोजी होईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post