कोयनानगर परिसरात भूकंपाचे धक्के
माय अहमदनगर वेब टीम
सातारा- कोयनानगर मध्ये पडलेली गुलाबी थंडी व कोयना वासीयाची साखरझोप आज सकाळी कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने उडाली आहे. परिसरात सकाळी 6.43 ला बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिक साखरझौपेतून खडबडून जागे झाले आहेत.
आज(23 डिसेंबर) पहाटे 6.43 ला भूकंपाच्या सौम्य धक्क्याने कोयना, पाटण, कोकण किनारपट्टीचा परिसर हादरला आहे.भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल तर भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 8 किमी होता. या भूकंपाचा धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसली तरी गुलाबी थंडी व साखरझोपेत असणाऱ्याची झोप मात्र उडाली आहे.
Post a Comment