
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -सावेडी उपनगातील प्रभाग क्र. 2 नव्याने विकसित होणारा व विस्ताराने मोठा असा प्रभाग आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु केले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून व मनपाच्या विविध निधीतून विकास कामे प्रस्तावित करुन मंजूर आहेत. ती कामे लवकरच प्रभागामध्ये सुरु होतील. नागरिकांच्या मुलभूत प्रश्नाबरोबरच मोठी विकासकामांची प्रश्ने मार्गी लावणार आहेत. सर्व प्रभागांचा समतोल विकास कामे करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. विकास कामांचे नियोजन करुन प्रभागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व प्रभागातील जमिनी अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचे लाईन टाकण्याचे आदी कामे केली जाणार आहेत. त्यानंतर रस्त्याची कामे, नागरिकांच्या आरोग्यासाठी रुग्णालय, ओपण स्पेसचे सुशोभिकरण, वाचनालय, चौक सुशोभिकरण, वृक्षारोपण असे अनेक कामे केले जाणार आहेत. पुढील 50 वर्षांचा विचार करुन प्रभागातील विकास कामे आम्ही मार्गी लावणार आहोत, असे प्रतिपादन मा. नगरसेवक निखील वारे यांनी केले.
प्रभाग क्र. 2 मधील बायजाबाई सोसायटी, कमलाविहार येथे बंदपाईप गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक नारायण घुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनिल त्रिंबके, नगरसेविका संध्या पवार, रुपाली वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, सयाजीराव वाव्हळ, संजय सानप, भारत आव्हाड, डॉ. राजेंद्र शेळके, गोरक्षनाथ बुधवंत, सूर्यभान पालवे, जगन्नाथ घुले, संगीता दळवी, पुष्पा म्हस्के, स्वाती गुप्ता आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नारायण घुले पुढे म्हणाले की, नगर शहर स्वच्छ व सुंदर हरित करण्यासाठी नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. प्रभागाच्या विकास कामामध्ये नागरिकांची मोठी जबाबदारी असते. प्रभाग क्र. 2 चे चारही नगरसेवक एकदिलाने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतात. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराबरोबर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे. तसेच वृक्षरोपण व त्याचे संवर्धन करुन प्रभाग हरित करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
Post a Comment