इंडियाचा विंडीजवर मालिका विजय
माय अहमदनगर वेब टीम
कटक- कर्णधार विराट काेहली (८५), राेहित शर्मा (६३)अाणि लाेकेश राहुल (७७) यांच्या झंझावाताच्या बळावर टीम इंडियाने रविवारी विंडीज संघावर मालिका विजयाची नाेंेद केली. भारताने तिसऱ्या अाणि निर्णायक वनडे सामन्यात विंडीजवर चार गड्यांनी मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून भारतीय संघासमाेर विजयासाठी ३१६ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे टार्गेट गाठले. भारताच्या विजयात अाघाडीच्या तीन फलंदाजांचे माेलाचे याेगदान राहिले. त्यांनी तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतकाच्या अाधारे विजयाचा मजबुत पाया रचला. त्यानंतर अाॅल राऊंडर रवींद्र जडेजा (३९) अाणि शार्दूल ठाकूरने (१७) नाबाद खेळी करताना भारतीय संघाचा विजय निश्चित केला. विराट काेहली सामनावीर अाणि राेहित शर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
६७ डावांत तीन हजार धावा पूर्ण, रिचर्ड््सवर मात
विंडीजच्या सलामीवीर शाई हाेपने शानदार ४२ धावांची खेळी केली. मात्र, त्याचा अर्धशतकाचा प्रयत्न अपुरा ठरला. यादरम्यान ३५ धावा केल्यानंतर त्याने वेगवान ३ हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने ६७ डावांत हा पराक्रम गाजवला. यासह त्याने अापल्याच देशाच्या महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड््स यांना यामध्ये मागे टाकले.
Post a Comment