मुजफ्फराबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर गोठवून टाकणाऱ्या थंडीत अचानक सैनिकांच्या वेगवान हालचालींमुळे तापले आहे. नीलम खोऱ्यात भारत-पाकदरम्यान सुरू असलेल्या चकमकींमुळे पाकिस्तानी लष्कराच्या या असामान्य हालचाली दिसून येत आहेत. गेल्या १० दिवसांत लष्करी वाहनांचे लांबचलांब काफिले मोठ्या तोफांसह व्याप्त काश्मीर भागात नियंत्रण रेषेलगत (एलओसी) दाखल होत आहेत.
१९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर प्रथमच असे वातावरण दिसून येत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या राखीव तुकड्याही एलओसीजवळ छावण्या उभारून तयारी करत आहेत. नीलम खोरे आणि देवा सेक्टरमध्ये लष्कराच्या हालचाली अधिक वाढल्या आहेत. नीलम खोऱ्यात अशात पाकिस्तानी सैनिकांनी सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. दैनिक भास्करला तेथील एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, लष्कराचे मोठे ट्रक प्रचंड शस्त्रसाठा घेऊन या भागात दाखल होत आहेत. हे ट्रक प्लास्टिकच्या ताडपत्र्यांनी झाकलेले आहेत. वास्तविक, भारत व्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करू शकतो, ही भीती पाकला आहे. याला पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्यानेही पुष्टी दिली.
Post a Comment