महापालिका कर्मचारी पतसंस्थेतर्फे सभासदांना नववर्ष भेट


सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात १ टक्का कपात जाहीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात १ टक्का कपात करत सभासदांना येणाऱ्या नवीन वर्षाची अनोखी भेट दिली असल्याची माहिती पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन बाबासाहेब मुदगल यांनी दिली.

पतसंस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडी नंतर संचालक मंडळाच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात माहिती देताना चेअरमन बाबासाहेब मुदगल म्हणाले, संचालक मंडळ सभेत सभासद कर्जावरील व्याजदर १ टक्का कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे सर्व सहकारी संचालक यांनी नेहमीच संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केलेल्या आहे. सभासदांना नवीन वर्षाची भेट म्हणून १ टक्का व्याजदर कमी करण्यात आला आहे. सभासद कर्जावरील व्याजदर पूर्वी १४ टक्के होता आता तो १३ टक्के करण्यात आला. संस्थेच्या सभासदांनी बाबासाहेब मुदगल यांच्या निर्णयाचे स्वागत मोठया उत्साहात केले. यावेळी संचालक सर्वश्री. विकास गिते, किशोर कानडे, सतिश ताठे, जितेंद्र सारसर, विलास सोनटक्के, श्रीधर देशपांडे, प्रकाश अजबे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, अजय कांबळे संचालिका नंदा भिंगारदिवे, सौ. चंद्रकला खलचे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, सह व्यवस्थापक राजु गंधे आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post