मनपाच्या शाळेत नवीन वर्षांपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणार - महापौर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येत्या शैक्षणिक वर्षा पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणार. व पूर्वीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वोपरी मदत करणार. भविष्यात या शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज खेळाचे मैदान, ई- लर्निंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगीतले.
महानगरपालिकेच्या महात्मा जोतीबा फुले प्राथमिक (मनपा शाळा क्रमांक १७ सावेडी) या शाळेत माजी विद्यार्थी व माजी शिक्षक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. स्नेहळाव्यासाठी पर्यवेक्षक जुबेर पठाण, माजी विद्यार्थी किशोर बारस्कर, मनोज अडोळे, संजय अडोळे, दिलीप वाकळे, राजेद्र बारस्कर, किसन बारस्कर, रोहिदास दंडवते,अविनाश जाधव माजी शिक्षक गाब्रा सर, कुबडे सर, सोनवणे सर, गवारे मॅडम, नूर मोहंमद पठाण आदी उपस्थित होते. यावेळी वाकळे म्हणाले १९७० साली स्थापन झालेल्या या शाळेत या शाळेमुळे आम्ही घडलो. चांगले संस्कार आमच्या शिक्षकांमुळे मिळाले म्हणून आज मी या पदापर्यत पोहोचलो. या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे कुठेही कमी पडणार नाहीत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचं काम शिक्षकांनी कराव असं त्यांनी आवाहन केलं. नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपतराव बारस्कर, रवींद्र बारस्कर, आशाताई कराळे यांनी स्नेह मेळाव्यात संवाद साधत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सीएसआर फंडातून अधिकाधिक निधी शाळेसाठी मिळवून देण्याची ग्वाही दिली. सुभाष पवार यांनी महानगरपालिकेच्या शाळा ह्या गुणवत्तेच्या बाबतीत खाजगी शाळांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. तसेच शिक्षकही गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील आहेत असं सांगितलं. व शाळांना अधिकाधिक सामाजिक निधी मिळवण्यासाठी सहकार्याची विनंती याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना केली.
हा स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी शंकरराव बारस्कर, अरुण पालवे, अभय ठाणगे, मुख्याध्यापक छाया गोरे यांच्या सह सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Post a Comment