माय अहमदनगर वेब टीम
पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे सुरू केलेल्या मौन आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस हाेता. राज्याच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांसह अनेक वारकऱ्यांनी या गावात भेट देऊन, भजन करुन हजारेंच्या आंदाेलनास पाठिंबा दिला.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या अारोपींना शिक्षा होईपर्यंत वेळेचा मोठा अपव्यय होतो.
या आरोपींना तत्काळ शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी अण्णांनी शुक्रवारपासून संत यादवबाबा मंदिरात मौन अांदाेलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे. आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना अण्णा जाणून घेत अाहेत. कागदावर संदेश लिहून त्यांना मार्गदर्शनही करत आहेत. आंदोलनादरम्यान अण्णांच्या दिनचर्येमध्ये फारसा फरक दिसत नाही. यादवबाबा मंदिरातील खोलीमध्ये मौनादरम्यान ते वाचन, मनन करतात. रविवारी जळगाव, चाळीसगाव येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी अण्णांची यांची भेट घेतली. एकादशी असल्याने पिंपळनेर येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी परतताना आठवणीने अण्णांची भेट घेतली. वारकऱ्यांनी राळेगणसिद्धीत भजन करून पाठिंबा दर्शविला.
वाढत्या अत्याचारामुळे व्यथित
महिलांवरील वाढते अत्याचार, आरोपींना शिक्षा देण्यात होत असलेला विलंब यामुळे आपण व्यथित असल्याने हे आत्मक्लेश आंदोलन करीत आहोत. यात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे मी म्हटले नव्हते. पीडित महिलांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे हजारे यांनी लिखीत संदेशाद्वारे स्पष्ट केले.
Post a Comment