शेतीच्या वादातून डोक्यात कुदळ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : शेताच्या सामाईक बांधावर कंम्पाउंड करण्यासाठी पोल रोवल्याच्या कारणावरून सात जणांनी तिघांना शिवीगाळ करून डोक्यात कुदळ, खोरे मारून व काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शेवगाव तालुक्यात घडली. या मारहाणीत सतीश जनार्धन वाकडे, जनार्धन वाकडे व शिवाजी वाकडे असे तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलिसांत सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, शिवाजी वाकडे, सतीश वाकडे व त्यांच वडील जनार्धन वाकडे यांनी शेवगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ असलेल्या शेतात समाईक बांधांवर तारेचे कम्पाउंड करण्यासाठी पोल रोवत होते. यावेळी पोपट काशीनाथ गावडे, राजेंद्र काशिनाथ गावडे, संतोष भानुदास गावडे, दिपक रावसाहेब गावडे, सचिन रावसाहेब गावडे, प्रभाकर शंकर गावडे, रावसाहेब दशरथ गावडे (सर्वजण राग़ावडे वस्ती, शेवगाव) हे सर्वजण या ठिकाणी आले. व तुम्ही आमच्या जमिनीत तार कम्पाउंड करायचे नाही.असे म्हणून सतीश वाकडे यांच्या डोक्यात कुदळ व खोऱ्याने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचे वडील जनार्धन वाकडे यांचे पुढील दोन दात पाडले तर शिवाजी वाकडे यास शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. यात बाप लेक तिघेही जखमी झाले आहेत.याबाबत सतीश वाकडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी वरील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी जवळे व पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. याबाबत अधिक तपास सपोनी ठाकरे हे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post