दरोड्याच्या तयारील टोळी जेरबंद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राहुरीच्या दिशेने नगर-मनमाड महामार्गावर कुठे तरी दरोडा घालण्याच्या तयारीत जात असताना शनिवारी (दि.२०) रात्री ९ वा. ६ दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. सागर आण्णासाहेब भांड, किरण रावसाहेब जरे, अमोल जगन कदम, श्रीकांत सुरेश लाहुंडे, अल्लाउद्दीन इब्राहिम शेख, दीपक रविकांत उपाध्याय पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार झाला आहे. यापैकी काहीवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून वाहने अडवून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार आहेत.
गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशीरकुमार देशमुख, सफौ. सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ बाळासाहेब मुळीक, पो.नि.रवींद्र कर्डीले, सचिन आडबल, अशोक गुंजाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, रवि सोनटक्के, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment