बाजार समितीला कै.माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उपनिबंधकाकडे सादर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर बाजार समितीला कै. माजी खासदर दादा पाटील शेळके यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे सह संचालक मंडळांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कडे आज दिला आहे. यामुळे आता बाजार समितीला कै. माजी खा.दादा पाटील शेळके यांचे नाव देण्यात येणार आहे.
नगर येथील बाजार समिती उभारण्यास कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या काळात त्यांनी बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दादा पाटील यांच्या मुळे ही बाजार समिती नावारूपाला आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली. बाजार समिती या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. शेतकऱ्यांच्या मालाचे ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण करण्याकरता समितीमार्फत विविध विकासकामे करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना बाजार समिती द्वारे यशस्वीरीत्या राबविल्या जातात. समितीची स्थापना झाल्यापासून समितीचे सर्व कामकाज हे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या नावाने केले जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर मतदार संघातून माजी खासदार कै. देवराम मारुती उर्फ दादा पाटील शेळके यांचे नुकतेच निधन झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे नामांतर माजी खासदार कै. देवराम मारुती उर्फ दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर असे करण्याबाबतचा विषय बाजार समितीच्या मासिक मिटिंग मध्ये घेण्यात आला. दादा पाटील शेळके यांनी बाजार समिती स्थापन झाल्यापासून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले . बाजार समितीच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याने बाजार समितीस त्यांचे नाव देणे उचित असल्यामुळे सर्व सदस्यांचे एकमत झाल्याने बाजार समितीचे नामांतर माजी खासदार कै. देवराम मारुती उर्फ दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर असे करण्यात यावे असे ठरले. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे , उपसभापती रेवणनाथ चोभे , दिलीप भालसिंग, संतोष म्हस्के, बाबासाहेब खर्से, संतोष कुलट , बाळासाहेब निमसे , बन्सी कराळे ,रभाजी सूळ , अभिलाष घिगे, रावसाहेब साठे , शिवाजी कार्ले, काशिनाथ चोभे,सचिव अभय भिसे सह संचालक उपास्थित होते .
Post a Comment