जनतेला आता अडाणी आमदार नको : ससाणे




माय नगर वेब टीम
श्रीरामपूर - तालुक्याचे प्रश्न मागील 10 वर्षांपासून गंभीर स्वरूपाचे झाले आहेत. आपण श्रीरामपूरकरांनी ज्यांना निवडून दिले, त्यांना यंत्रणाच माहित नसल्याने तालुक्याचा विकासच करता आला नाही. त्यांचा प्रशासनाचा अभ्यासच नाही. म्हणूनच आता अशा अडाणी आमदाराला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे प्रतिपादन करण ससाणे यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार लहु कानडे उच्चशिक्षित असून त्यांना शासकीय पातळीवरून कामे खेचून आणण्याचा अनुभव आहे. आणि अशाच कौशल्यपूर्ण व अभ्यासू नेतृत्वाची नितांत आवश्यकता श्रीरामपूरच्या जनतेला आहे व ती तुम्हीच मिळवून देणार असेही श्री. ससाणे म्हणाले. चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करजगाव, जातप, भेर्डापूर या गावांतील प्रचार बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी जी. के. बकाल, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले, राष्ट्रवादीचे कैलास बोर्डे, सुभाष राजुळे, पंडितराव बोंबले, दीपक पवार, मदन हाडके, आबा पवार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे उमेदवार लहु कानडे म्हणाले, माझ्या विरोधात जे लोकप्रतिनिधी आरोप करतात की, मी श्रीरामपूरचा नाही, परंतु त्यांना माहिती नसेल कि, माझे घरच श्रीरामपूरमध्ये आहे. मी स्वतःला श्रीरामपूरचा एक घटकच समजतो आहे. मला तालुक्यासाठी काम करायचे आहे. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन तळागाळातील जनतेला विकासाच्या प्रक्रियेत आणायचे आहे. परंतु विरोधी लोक प्रतिनिधीकडे विकासाचा मुद्दाच नाही, म्हणूनच ते चुकीचे आरोप करून श्रीरामपूरच्या जनतेला फसवण्याचेच काम करत आहेत. परंतु श्रीरामपूरची जनता हुशार आहे, ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post