आ. जगताप-राठोड यांना किरण काळे यांचे खुल्या चर्चेचे आव्हान



माय नगर वेब टीम

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांना नगर शहराच्या विकासाच्या प्रश्नावर तमाम नगरकर मतदारांच्या समोर चर्चा करण्यासाठी खुले आव्हान दिले आहे.

उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती समोर नगर शहराच्या मागच्या तीस वर्षाचा खुंटलेला विकास आणि शहरातील राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण याबाबत नगरच्या जनते समोर जाहीर चर्चा करण्याचे आवताण काळे यांनी दिले आहे.




तसेच पुढील ३० वर्षांसाठी शिवसेना, वंचित आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे काय व्हिजन आहे यावर देखील चर्चा होण्याची गरज आहे, असे काळे यांनी म्हटले आहे.






काळे यांचे स्वतःच्या स्वाक्षरीचे सदर आव्हान देणारे निमंत्रण पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी आ.अनिल राठोड आणि आ.संग्राम जगताप यांना पाठवले आहे.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post