नगर का आमदार कैसा हो... आमदार संग्राम जगताप जैसा हो.... ; आ. जगताप यांनी मांडले शहर विकासाचे व्हिजन 2024


माय नगर वेब टीम

अहमदनगर - राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी गेल्या 5 वर्षात नगर शहरात केलेल्या विकासा कामांचा लेखाजोखा मांडून पुढील पाच वर्षाचे विकासाचे व्हीजन घेऊन होणारे नगर शहरातील विकास कामे सांगण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, युवक-युवती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर संग्राम जगताप यांचा जीवनपट दाखविण्यात आला. त्यानंतर संग्राम जगताप यांनी व्यासपीठावर येऊन गेल्या 5 वर्षात नगर शहरात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा व व्हीजन 2024 छायाचित्रांसह मांडले.

यावेळी आ.संग्राम जगताप गेल्या 5 वर्षापूर्वी नगरच्या जनतेने मला मतदान करुन माझ्यावर विश्‍वास टाकून आमदारकीची जबाबदारी दिली होती. या विश्‍वासास पात्र राहत नागरिकांना दिलेल्या वचनांची, आश्‍वासनांची पूर्ती करत नगर शहरात गेल्या पाच वर्षात भरीव विकास कामे करता आली. विरोधी पक्षाचा आमदार असतांना सातत्याने शासन दरबारी पाठपुरवठा करुन विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. या निधीतून बरीचशी विकास कामे मार्गी लागली असून, काही प्रगतीपथावर आहेत. नगर शहराच्या विकासासाठी 116 कोटी रुपयांची फेज-2 योजना कार्यान्वित करुन नगर शहराचा कायमचा पाण्याचा प्रश्‍न सोडविला आहे. प्रत्येक प्रभागात तसेच विविध भागांमध्येही उद्याने विकसित करत आहे. बालिकाश्रम रोडसाठी 70 कोटी, केडगांव ते सारोळा रस्त्यासाठी 2 कोटी 52 लाख, केडगांव ते बुरुडगांव रस्त्यासाठी 3 कोटी, केडगांव ते निंबळक रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणून या सर्व रस्त्यांची काम पूर्णत्वास आले आहे. मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत नगर शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्‍न सुटण्यासाठी सतत पाठपुरवठा करत निधी मंजूर करुन आणला आहे. या योजनेंतर्गत वारुळाचा मारुती ते निंबळक रस्त्यासाठी निधी तसेच तपोवन रोडसाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणून आज कामे प्रगतीपथावर आहेत. शहराजवळील संपूर्ण बुरुडगांव समस्यांयुक्त होते. या गावामध्ये विविध योजनांमधून सुमारे 6 ते 7 कोट रुपयांची विविध विकास कामे मंजूर करुन विकासात मोलाची भर घातली आहे. बुरुडगांव रोडवरील भिंगार नाल्यावर 1.5 कोट रुपयांचा पूल तयार केला आहे. नगर शहरातील प्रत्येक चौकात अत्याधुनिक हायमॅक्स व अंतर्गत पथदिव्यांची 40 कोट रुपयांचा निधीतून झाले आहेत. तसेच सावेडी, केडगांव, बोल्हेगांव या उपनगरांमध्ये आरोग्य केंद्रे सुरु केली आहेत. शहरातील विविध भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक भवन, ओपनस्पेस सुशोभिकरण केले आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात रक्त मिळावे यासाठी मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीचे 75 लाख रुपयांत नूतनीकरण केले आहे. येणार्‍या काळात नगर शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, यासाठी घरकुल योजना राबविणार असे सांगितले. 2014 साली आमदार होण्याअगोदर या नगर शहराची परिस्थीती काय होती आणि आज काय आहे. याची तुलना नागरिकांनीच करावी.

आ.संग्राम जगताप यांनी पुढील 5 वर्षांचे व्हीजन 2024 मांडतांना सांगितले, आमदार या नात्याने गेल्या 5 वर्षात 25 वर्षांचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्याचा प्रयत्न केला. आता 2024 सालचे आपले नगर शहर कसे असेल, या दृष्टीने विचार करत कामे सुरु केली आहे. शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता नियोजन करत आहे. येणार्‍या 5 वर्षात शहराचे पर्यटन वाढले तर सर्वक्षेत्राला फायदा होईल. त्यामुळे पर्यटनाला चालना देणार आहे. शहरातील 100 डि.पी.रस्त्यांचे काँक्रीटीकरण करुन शहरातील रस्त्याचा प्रश्‍न कायमचा सोडविणार आहे. महानगरपालिकेवरील लाईट बिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शहरात सर्व भागामध्ये सोलर पथदिवे लावून वीज बीलमुक्त शहर करणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील प्रत्येक भागात अत्याधुनिक सीसीटीव्ही लावून गुन्हेगारीस वचक बसणार आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये अद्यावत डिजिटल लायब्ररी सुरु करणार. महिला सशक्तीकरणासाठी शहरातील 10 हजार महिलांना नामांकित कंपन्यांमार्फत गृहउद्योग मिळवून देणार. भिंगारमध्ये वाडिया पार्कच्या खालोखाल आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार. उद्याचे युवक शहरातच थांबण्यासाठी एमआयडीसीचे विस्तारीकरण करुन नवनवीन उद्योजकांना पाचारण करणार. शहरात एक आयटी पार्क सुरु केले आहे. भविष्यात असे अनेक आयटीपार्क वाढावे, व त्याद्वारे 9 हजारहून अधिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न. स्टार्टअप अहमदनगर सुरु करुन नवउद्योजक निर्माण करुन प्रोत्साहन देणार. नगर-पुणा इंटरसीटी रेल्वे येत्या काही वर्षात सुरु करणार. संपूर्ण नगर शहराला फ्री वायफाय इंटरनेट सुविधा देऊन स्मार्ट शहर करणार. सीना नदीचे सुशोभिकरणा पुन्हा पाठपुरवठा करुन मार्गी लावणार. ही सर्व कामे आपोआप होणार नाही, त्यासाठी नियोजन व पाठपुरवठा लागणार आहे. गेल्या 5 वर्षात या सर्व कामांची पायाभरणी केली आहे. आता येणार्‍या पाच वर्षात प्रत्यक्ष विकास कामांची उभारणी करणार आहे. विकास कामांसाठी माझी जिद्द व चिकाटी आहे. व्हीजन 2024 सर्व नागरिकांपुढे मांडले आहे. या व्हीजनच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे नगर शहराची इमेज बिल्टअप होणार आहे. टिकटिप्पनी माझ्यावर करा मात्र नगर शहराला बदनाम करु नका. ज्यांनी नगर शहराचे नाव बदनाम केले, त्यांना शहराची इमेज बिल्टअप करुन उत्तर देणार आहे. हे व्हीजन 2024 पूर्ण करण्यासाठी मला नगर शहरातील सर्व नागरिकांची साथ, पाठबळ व आशिर्वादरुपी मतांची गरज आहे. हे व्हिजन पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्विकारली असून, पूर्णत्वास नेणारच आहे. यासाठी पुन्हा एकदा नगर शहराचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मला द्यावी.

सुमारे 1 तास 25 मिनिटे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा व व्हीजन 2024 उपस्थित सर्व नागरिकांपुढे मांडले. हे सादरीकरण संपल्यावर उपस्थित सर्वांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ‘संग्राम जगताप वन्स मोअर.... वन्स मोअर..., नगर का आमदार कैसा हो... आमदार संग्राम जगताप जैसा हो.... या घोषणांनी संपूर्ण माऊली सभागृह दणाणुन गेले. तसेच संग्राम जगताप यांनी व्हीजन 2024 चे स्मार्ट प्रेझेंटेशनबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यास झुंबड उडाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post