अनिल राठोड यांच्या पाठिशी महिलांची मोठी ताकद - माजी महापौर कदम
माय नगर वेब टीम
अहमदनगर-महिलांना संरक्षण आणि त्यांचा सन्मान हीच शिवसेनेची भुमिका राहिली आहे. महिलांना त्यांचे हक्क आणि प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आताही शिवसेनेच्या वचनमान्यातच महिलांचे सक्षमीकरण आणि बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवसेना नेते अनिल राठोड यांनीही नेहमीच शहरातील विविध महिला संघटनांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. पाणी, शिक्षण, रोजगार अशा विविध पातळ्यावर विकासात्मक दृष्टीकोन ठेवला. त्यामुळेच आज शहरातील अनेकांना महिला या अनिलभैय्या राठोड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत व अनिलभैय्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करुन निवडून देतील, असा विश्वास माजी महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ महिलांनी माळीवाडा भागातून प्रचारफेरी काढली. यामध्ये सौ.शशिकला अनिल राठोड, माजी महापौर कदम, नगरसेविका मंगल लोखंडे, रचना राठोड, अनिता राठोड, भारती कदम, कोठारी आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर कदम म्हणाले, शिवसनेनेमध्ये महिलांचा नेहमीच सन्मान केला, त्यामुळेच माझ्या सारख्या सामान्य महिलेलाही महापौर होण्याचा मान शिवसेनेने दिला आहे.आपण महापौर पदाच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करुन शहराचे विविध प्रश्न सोडविले. केंद्र व राज्यात भाजप-सेनेचे सरकार असल्याने अनेक योजनांसाठी मोठा निधी आणता आला. स्त्रीयांचे प्रश्न सोडविता आले. आताही पुन्हा महाराष्ट्रात सेना-भाजपाचीच सत्ता येणार असून, त्यामुळे नगरच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड निवडून द्यावे, असे आवाहन केले.
Post a Comment