अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी नगरच्या ऐश्वर्या वाघ हिची निवड


माय नगर वेब टीम
अहमदनगर - राजस्थान मधील जनार्दन राय नागर राजस्थान विद्यापीठ, उदयपूर या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी लोंढे मळा, केडगाव येथील शिवम ग्लोबल स्कूलची क्रीडा शिक्षीका ऐश्वर्या वाघ हिची निवड झाली आहे. ती पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

नगरच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नाशिक विभागाच्या खेळाडूला पराभूत करत ऐश्वर्या वाघ हिने पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्णपदक जिंकले.

ऐश्वर्या हिचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने आजपर्यंत १६ सुवर्णपदक व १ रौप्य पदक मिळवलेले आहे. तिला प्रशिक्षक योगेश बिचीलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, प्राचार्य नंदकुमार शेजूळ व सहशिक्षीकांनी अभिनंदन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post