साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता






माय नगर वेब टीम
शिर्डी - श्रीसाईबाबा संस्थाच्यावतीने दिनांक 7 ऑक्टोबर 2019 पासून सुरू असलेल्या श्री पुण्यतिथी उत्सवाची सांगता काल गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व पत्नी जयश्रीताई मुगळीकर यांच्याहस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व त्यांची पत्नी वैशाली ठाकरे यांच्याहस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 6.15 वाजता धुपारती झाली. रात्री 7 ते 10 अश्विनी जोशी, नाशिक यांचा भजन संध्या कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. रात्री 9.15 वाजता श्रींची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक निघाली. या पालखी मिरवणुकीत संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

त्यानंतर रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती झाली. हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post