लाईटचे कनेक्शन जोडण्यासाठी मागितली 25 हजारांची लाच



माय नगर वेब टीम 
श्रीगोंदा - येथील इलेक्ट्रीक दुकानाचे बील रद्द करून ते कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्विकारतांना महावितरणचे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई नगरपालिका कार्यालयाजवळ शनिवार (दि.12) रोजी करण्यात आली.









महावितरणचे संदीप सोपान फुलवर व कंत्राटी कर्मचारी अनिल साहेबराव तवले यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा येथील भैरवनाथ चौकातील इलेक्ट्रीक मोटार दुरूस्तीच्या दुकानाचे बील येत नसल्याने दुकानाचे कनेक्शन महावितरण ने तोडले होते.
त्यांना 35 हजार 60 रुपयांचे बील देण्यात आले. व ते बील रद्द करण्यासाठी संदीप फुलवर व अनिल तवले यांनी तब्बल 25 हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, तनवीर शेख, सतीष जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, चालक हारून शेख व अशोक रक्ताटे यांच्या पथकाने सापळा रचवून नगर पालिका कार्यालया जवळील लाच स्विकारतांना दोघांना पकडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post