श्री बडीसाजन ओस्तवाल युवक संघाच्या अध्यक्षपदी तुषार चोरडिया ; सेक्रेटरीपदी आशिष देसरडा



माय नगर वेब टीम

अहमदनगर - श्री बडीसाजन ओस्तवाल युवक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी तुषार चोरडिया, सेक्रेटरी आशिष देसरडा, उपाध्यक्षपदी अतुल शेटिया, दिनेश संकलेचा यांची निवड करण्यात आली आहे.

या नूतन कार्यकारिणीचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विपुल शेटिया, धनेश कोठारी,रा जेश बोरा, शांतीलाल संकलेचा, दिनेश शिंगवी, सचिन छाजेड, मनोज बरलोटा, रमन देसरडा, किरण राका, अनिल सुराणा, आनंद बोथरा, विकास सुराणा, प्रवीण शिंगवी, चेतन छललानी, सिद्धार्थ बंब, संदेश कर्णावट, आकाश भन्साळी, धीरज लोढा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष तुषार चोरडिया म्हणाले, श्री बडीसाजन ओस्तवाल युवक संघाची स्थापना ३१ वर्षांपूर्वी झाली आहे, या संघाला एक उज्ज्वल परंपरा असून त्या माध्यमातून समाजातील युवकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत, युवकांचे शैक्षणिक प्रश्न, गुणवंतांचा सत्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधी उपलब्ध करून दिला आहे.फूड बँक स्थापन करण्यात आली आहे. गणेशोत्सवनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरासह विविध आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. नूतन पदाधिकारीही संघाची ही परंपरा पुढे चालू ठेवतील असे त्यांनी सांगितले.

आ.संग्राम जगताप यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सामाजिक संघटनेत काम करण्याची संधी मिळणे ही खूप महत्वाची बाब आहे. या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविले जातात. समाजातील तळागाळातील गरजूंना मदतीचा हात दिला जातो.हे मोठे कार्य असते. या नूतन पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन त्यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post