ठरलं तर युतीत! भाजप शिवसेना लढवणार एवढ्या जागा ?



माय नगर वेब टीम
मुंबई – विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत.याच पार्श्ववभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागावाटपासंदर्भात पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळतीय. या बोलणीमध्ये भाजप १६० तर शिवसेना ११० जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यामध्ये जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील दुसरी बैठक आज होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागावाटपाविषयी प्राथमिक फॉर्म्लुल्यानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप-शिवसेना २७० जागा लढवणार आहेत. तर घटक पक्ष १८ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप १६० , शिवसेना ११० आणि घटक पक्ष 18 जागा लढतील असा फॉर्म्लुला पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आल्याची माहिती मिळतीय. यासोबतच तसेच अदला बदलीच्या जागांवर देखील चर्चा होणार असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post