शिक्षकांनी आपल्या मूळ जबाबदाऱ्या ओळखाव्यात : राष्ट्रपती




माय नगर वेब टीम
नवी दिल्ली   - माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस- शिक्षक दिन आज साजरा होत आहे.राष्ट्रनिर्माणामध्ये शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असून, शालेय जीवनातच चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया सुरु होते, शिक्षकांबद्दलचा आदर हा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा आधार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. शिक्षकांनी आपल्या मूळ जबाबदाऱ्या ओळखाव्यात असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं आहे.




शिक्षक दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगरचे श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. देशभरातल्या एकूण ४६ शिक्षकांना यावेळी राष्ट्र्पतींच्या हस्ते गौरवण्यात आलं.

रौप्य पदक, मानपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार आज मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत.औरंगाबाद जिल्हा परीषदेनं आपल्या १६ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचंही आज वितरण केलं जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post