लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियमच्या अध्यक्षपदी उद्योजक मल्लेश नल्ला
माय नगर वेब टीम
अहमदनगर - लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियम या सेवाभावी संस्थेच्या सन २०१९-२० करिता अध्यक्षपदासाठी अहमदनगर येथिल एस.वाय. टेलर्स चे संचालक मल्लेश नल्ला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सचिवपदी हेमंत नरसाळे व खजिनदारपदी राजकुमार गुरनानी यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या क्लबच्या सभेमध्ये क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सौ. मिना हरवाणी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा ठराव मांडला व मावळत्या सचिव सौ. वंदना ललवाणी यांनी अनुमोदन दिले.
या सर्वांचा पदग्रहण समारंभ शनिवार दि. ७ सप्टेंबर २०१९ रोजी हॉटेल व्ही स्टार, तारकपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या पदग्रहण समारंभाचे अध्यक्षपद कमल मोटर्स, अ.नगर चे संचालक व उद्योजक विजय हेगडे हे भुषविणार आहेत, तसेच कार्यक्रमाचे नियोजन हरिष रंगलानी करणार आहेत. प्रमूख वक्ते म्हणून अभिनेते मोहिनीराज गटणे हे उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिलेनियम तर्फे आतापर्यंत दरवर्षी विविध सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच परमनंट प्रोजेक्ट अंतर्गत गरजू संस्था व व्यक्तींना मदत केली जाते. या वर्षी देखिल बाबावाडी, नालेगाव येथे हॉल नुतणीकरणाचे काम हाती घेतले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment